Tuesday, January 2, 2018

श्री कृष्ण भगवंताचे दर्शन


               प्रत्येक वेळेस आपण भगवंताला मंदिरात शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तो भगवान परमात्मा तर आपल्या ह्रदय मंदिरात आहे. भगवदगीतेत भगवंत स्वत: सांगतात की,

                  सर्वस्य चाहं  ह्रदि सन्निविष्टो- 
                       मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
             वेदैच्श्र सर्वैरहमेव वेद्यो –

                       वेदान्तकृव्देदविदेव चाहम् ।।



भगवंत म्हणतात की, मी सर्वांच्या ह्रदयात स्थित आहे. माझ्यामुळेच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होते. निसंदेह सर्व वेदांचा संकलक मीच आहे. सर्व वेदांव्दारे जाणण्यायोग्य ही मीच आहे.

पुढे भगवंत हे ही सांगतात की, 
                      बहिरन्तच्श्र भूतानामचरं चरमेव च ।
                      सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ।।

परम सत्य हे सर्व चराचर प्राणिमात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्याकारणाने भौतिक इद्रियांच्या पाहण्याच्या आणि जाणण्याच्या ग्रहणशक्ती पलिकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे.

भगवंताला शाेधण्यासाठी कुठे ही जाण्याची गरज नाही. ज्ञान आपल्या अंतरात आहे. ते जागृत करण्यासाठी भक्ती मार्गाची ओेढ हवीय. 


श्री कृष्ण भगवंताचे दर्शन

                प्रत्येक वेळेस आपण भगवंताला मंदिरात शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तो भगवान परमात्मा तर आपल्या ह्रदय मंदिरात आहे. भगवदगीतेत भग...