Saturday, December 9, 2017

कृष्ण आणि मी

श्री कृष्ण आणि मी

पुर्व जन्मीची पुण्याई माझी मला कामी आली

     अमृताहुन ही गोड भगवदगीता माझी आई झाली ।। धृ ।।

तिनेच तारीले विश्व हे सारं

तिच या भाबडया मनाचा आधारं

उपदेश करुनी सारया जगाला

तिनेच शिकविले मला जगायला
       
अशा या भगवद ज्ञानाची मला ही तहान लागली ।। 1 ।।

घडविला तिने राजा शिवाजी

अमृताहुन गोड केली ज्ञानेश्वरी

निर्माण केले तिने क्रांतिकारीमध्ये तेज

बनुनी बुध्द दिला तिनेच शांति संदेश

अमृताची पैज जिकंणारी भगवदगीता माझी माउली झाली ।। 2 ।।

आता माझा एकची ध्यास

राहील बनुनी मी तुझ्या चरणाचा दास

मधुर तुझी ती वाणी

करेन मी रोज श्रवण आनंदाने

खोटया मृगजळाची भटकंती तु थाबंलीस, गुरु तु माझी झाली ।। 3 ।।

No comments:

Post a Comment

श्री कृष्ण भगवंताचे दर्शन

                प्रत्येक वेळेस आपण भगवंताला मंदिरात शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तो भगवान परमात्मा तर आपल्या ह्रदय मंदिरात आहे. भगवदगीतेत भग...